मोठा दिलासा! राज्याने पूर्ण केला 10 कोटी लसीकरणाचा टप्पा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.
Vaccination
VaccinationTeam eSakal
Updated on

मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सुरु असलेल्या लसीकरण (Vaccination) मोहिमेत राज्याने आज 10 कोटी लसींचा टप्पा पुर्ण केला आहे. त्यामुळे आता देशात लसीकरण मोहिमेचा हा मोठा टप्पा करणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. CoWIN पोर्टलमधून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदवलेल्या डोसची संख्या 10,00,65,237 आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांच्या एकूण संख्येपैकी 6,80,28,164 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे असून दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 3,20,37,073 आहे.

आज महाराष्ट्राने 10 कोटी COVID19 लशींचा प्रशासनाचा बेंचमार्क ओलांडला आहे. सर्व जिल्हाधिकार्‍यांच्या सक्रिय सहभागाने हे शक्य झाले असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी या टप्प्याचे वर्णन मैलाचा दगड म्हणून केले आहे. “हे यश मोठे परिश्रम, धोरणात्मक निर्णय आणि राज्य आणि प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय संस्था, आरोग्य सेवा कर्मचारी, काळजी घेणारे आणि जबाबदार नागरिकांच्या मेहनतीचे फळ आहे. तथापि, आम्ही आमच्या रक्षकांना निराश करू नये,” डॉ पंडित म्हणाले.

Vaccination
"आमचा विजय नक्की होणार"; राज्यपालांच्या भेटीनंतर क्रांतीला विश्वास

कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याला मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यावेळी राज्य सरकारने लसीकरणाच्या मोहिमेवर मोठा भर दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kalyanshetti
solapur city DJ Noise Case
government scheme
Voter List Updation
Marathi News Esakal
www.esakal.com