Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

Malegaon corona update
Malegaon corona updatesakal

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची (maharashtra Corona Update ) संख्या कमी होताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 21 हजार 273 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 34 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 93.02 टक्के झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर 1.63 टक्के आहे. राज्यात सध्या 3 लाख 01 हजार 041 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यातील 52 लाख 76 हजार 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने ( health ministry) यासंदर्भातील माहिती दिली आहे. (maharashtra Corona Update active cases health ministry rajesh tope)

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. लॉकडाऊन उठणार नाही, मात्र त्यात शिथिलता आणण्यासंदर्भातील वक्तव्य आज टोपे (Rajesh Tope) यांनी केलं आहे. मात्र, त्यासंदर्भातील सविस्तर चर्चा आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत होऊ शकली नाहीये. राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत राज्यातील करोनाच्या सद्य स्थितीबाबत चर्चा झाल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात काही ठिकाणी करोना रुग्णांची संख्या कमी झाली. पण यावरुन संपूर्ण राज्यात आकडेवारी कमी झाली असे म्हणता येणार नाही. टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुणे कोरोना स्थिती

शहरात काल नव्या ६८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर आज नव्याने ५८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६८ हजार १२९ इतकी झाली आहे. शहरातील ९२१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ५१ हजार ९९१ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com