कोरोना रिटर्न्स ! राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 81% वाढ 

कोरोना रिटर्न्स ! राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 81% वाढ 

मुंबई, 26: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणू सक्रिय झाला आहे. गेल्या 17 दिवसांत कोरोनाचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 81 टक्क्यांनी वाढली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू पुन्हा एकदा वाढत आहे, पण, बरेच लोक त्यात लक्षणविरहीत आहेत. 

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास महाराष्ट्रात 10 फेब्रुवारी रोजी 35633  सक्रिय रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत होते. केवळ 17 दिवसांत, सक्रिय रूग्णांची संख्या 64,260 वर पोहोचली आहे. वरील आकडेवारीवरून असे दिसून येते की, 3 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत सक्रिय रुग्णांची संख्या 81 टक्क्यांनी वाढली आहे. 

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, यावेळी कोरोना विषाणूमुळे 30 ते 50 वयोगटातील लोक जास्त प्रमाणात ग्रासले आहेत. हा कल आधीपासून तसाच आहे; चांगली गोष्ट म्हणजे दररोज या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या बरीच कमी झाली आहे. 

50 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना धोका - 

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सध्या होणाऱ्या मृत्यूंमध्ये वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त लोकांना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. 

मुंबईत 67% सक्रिय रुग्ण - 

मुंबईतही गेल्या 17 दिवसांत सक्रिय रूग्णांच्या संख्येत 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 फेब्रुवारी रोजी मुंबईत 5369 सक्रिय रुग्ण होते, ते गुरुवारपर्यंत 8997 पर्यंत वाढले आहेत. 

70% लक्षणे नसलेले - 

पालिकेचे उप आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे 70 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. एकाच कुटुंबातील बरेचसे लोक पाॅझिटिव्ह येत आहेत. चांगल्या संपर्क ट्रेसिंगमुळे मुंबईत सक्रिय रूग्णांची संख्या वाढत आहे.

maharashtra count of active covid patients increasing 81 percent rise novel corona patients in state

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com