Raigad Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Raigad Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ६ डिसेंबर रोजी एका ५ वर्षीय चिमुकलीवर 19 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिला घरात घेवून जात तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

तर सातारच्या पाटण तालुक्यातील एका गावातील युवकाने अल्पवयीन मुलीला वेळोवेळी दमदाटी, शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. रायगड जिल्ह्यातील तळोजा येथे मोहम्मद अख्तर मथार हुसेन या १९ वर्षीय तरुणाने ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हेही वाचा: Gujarat Election Result 2022: गुजरात निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..."

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

आरोपीने मुलीला खेळत असताना लिफ्टमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी एसी मेकॅनिक असून तो जवळच्या फ्लॅटमध्ये जात होता. त्याने वेळ साधन शेजाऱ्यांचा डोळा चुकवत तीला लिफ्टमध्ये घेवून जात अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी आल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या.

तिला आईने विचारल्यानंतर, तिने हा प्रकार उघडकीस आणला आणि तिच्या पालकांसह शेजारी बाहेर जमल्या लोकांनी आरोपीला पळून जाण्यापूर्वीच पकडले, पीडित मुलीने त्याला ओळखल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. मात्र वारंवार होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आरोपीना कायद्याची भिती नाही का, पोलिस प्रशासन कमी पडत आहे. असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे.