Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

Maharashtra Has Most Dams Yet Faces Water Challenges : देशात सरासरी साडेसहा हजार धरणे असून सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात असल्याचे केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितले.
Maharashtra Dams

Maharashtra Dams

esakal

Updated on: 

धुळे : देशात सरासरी साडेसहा हजार धरणे असून, यात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत. असे असतानाही या राज्यात पाण्याची समस्या का भेडसावते, असा सवाल केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी येथे उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रात जल जीवन मिशनअंतर्गत गुणवत्तापूर्ण व वेळेत कामे होत नसतील, तर संबंधित ठेकेदारांना कोणतीही दयामाया न दाखविता काळ्या यादीत टाकावे, अशी परखड सूचनाही मंत्री पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून केली.

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त शहरात आज झालेल्या कार्यक्रमास जलशक्तीमंत्री पाटील, जलसंपदामंत्री महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते. त्या वेळी जलशक्तीमंत्री पाटील यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती, धरणे, उपसा सिंचन योजना, जलसंधारण आणि पाण्याचा पुनर्वापर आदी निरनिराळ्या विषयांवर सखोल ऊहापोह केला.

Maharashtra Dams
Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

लोकसहभागातून पाण्याचे स्रोत टिकवून ठेवणे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब कसा महत्त्वाचा आहे, यावरही त्यांनी भाषणातून भर दिला. ‘ॲक्शन मोड’मध्ये या पाटील म्हणाले, की देशात सर्वत्र पर्जन्य जलसंचयाची रचना उभारण्यासाठी राज्य सरकारे व नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. ही जनचळवळ झाली, तरच भविष्यात पाण्याच्या संकटाला यशस्वीपणे तोंड देता येईल.

‘जल जीवन मिशन’ अभियानांतर्गत १७ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या चौकशीअंतर्गत आतापर्यंत राजस्थानमधील एक मंत्री व एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यासह ४०० जणांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निष्काळजी ठेकेदार कोणाचेही सगेसोयरे असले, तरीही त्यांच्यावर जलसंपदामंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दबावाला बळी न पडता कारवाईसाठी पुढे यावे. राज्य सरकारने ‘ॲक्शन मोड’मध्ये यावे, अशी अपेक्षा मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com