प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणाचा तपास DGP करणार : गृहमंत्री

साईल एनसीबीच्या कारवाईत असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता.
प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणाचा तपास DGP करणार : गृहमंत्री

मुंबई : कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail ) याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. या सर्व घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Maharashtra Home Min Dilip Walse Patil On Prabhakar Sail death case)

प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणाचा तपास DGP करणार : गृहमंत्री
India-Nepal Train : पळती झाडे पाहुया रेल्वेने नेपाळला जाऊया!

पंच साईल याच्या मृत्यूनंतर संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली असून, यामागचे नेमके सत्या काया हे समोर येण्यासाठी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, येत्या काही दिवसात साईलच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल येण्याची शक्यता असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

कोण होता प्रभाकर साईल

कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज (Cardilia Cruise Drugs Party) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने (NCB) केलेल्या या कारवाईत प्रभाकर साईल हा पंच होता तसेच साईल एनसीबीच्या कारवाईत असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता.

"साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?"

अतुल भातखळकर ट्वीट करत म्हणाले, “मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?” मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत प्रश्न उपस्थित करताच काही वेळाने याप्रकरणातील तक्रारदार मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. हिरेन यांचा मृतहेद मुंब्रा खाडीत पोलिसांना सापडला होता. यावरुन भातखळकरांनी पंच प्रभाकर साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना, असा टोला लगावलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com