India-Nepal Train : पळती झाडे पाहुया रेल्वेने नेपाळला जाऊया!

प्रवाशांसाठी ही सेवा उद्यापासून म्हणजेच 3 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
India Nepal Train
India Nepal TrainSakal

नवी दिल्ली : तब्बल 8 वर्षांनंतर भारत आणि नेपाळदरम्यान पुन्हा एकदा रेल्वे सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे सेवेचे उद्घाटन केले. ही रेल्वे सेवा बिहारमधील जयनगर ते नेपाळमधील (Nepal) जनकपूरमार्गे कुर्थाकडे धावणार आहे. प्रवाशांसाठी ही सेवा उद्यापासून म्हणजेच 3 एप्रिलपासून सुरू होणार आहे. रेल्वेच्या या सेवेमुळे दोन्ही देशांमध्ये जवळीकता येईल असे मत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि नेपाळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना सोबत पासपोर्ट ठेवणे बंधनकारक असणार आहे. (India Nepal Train)

पीएम मोदी म्हणाले की, भारतीय नववर्ष आणि नवरात्रीच्या निमित्ताने नेपाळचे पंतप्रधान देउबा यांचे स्वागत आहे. देउबाजी हे भारताचे जुने मित्र आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पाचवा भारत दौरा आहे. आपली सभ्यता, आपली संस्कृती, आपल्या देवाणघेवाणीचे धागे प्राचीन काळापासून जोडलेले आहेत. नेपाळच्या शांतता, प्रगती आणि विकासाच्या प्रवासात भारत एक मजबूत भागीदार आहे आणि राहील असेदेखील ते म्हणाले. (Documents For India Nepal Train Journey)

India Nepal Train
धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचं काम सुरू; शरद पवार

रेल्वेने नेपाळला जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

भारतातून नेपाळला रेल्वेने जाण्यासाठी पासपोर्ट (Passport) अनिवार्य असणार नाही. तथापि, प्रवासादरम्यान भारत सरकार किंवा राज्य सरकारांनी जारी केलेले फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल. पासपोर्ट बंधनकारक नसेल, पण प्रवासी देखील पासपोर्ट घेऊन नेपाळला येऊ शकतील. या पॅसेंजर ट्रेनचा विस्तार नेपाळमधील वरदिवासपर्यंत केला जाणार आहे.

India Nepal Train
राज्यात पुन्हा पाऊस! नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा

या कागदपत्रांना मान्यता

  • भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटो ओळखपत्र.

  • भारत निवडणूक आयोगाने जारी केलेले फोटो ओळखपत्र.

  • नेपाळमधील भारतीय दूतावास/भारतीय वाणिज्य दूतावासाने जारी केलेले आपत्कालीन प्रमाणपत्र किंवा ओळखीचा पुरावा.

  • ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी आवश्यक कागदपत्र

  • याशिवाय, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सीजीएचएस कार्ड किंवा रेशन कार्ड इत्यादी 65 वर्षांपेक्षा जास्त आणि 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांच्या वय आणि ओळख पडताळणीसाठी वैध असतील.

India Nepal Train
नाशिक : चांदीच्या गणपतीसमोर 21 फूट उंच गुढी

प्रवासात 9 थांबे (Stations During India Nepal Train Journey )

नेपाळला जाण्यासाठी जयनगर ते कुर्था दरम्यान एकूण 9 थांबे असतील. बिहारमधील जयनगर येथून ही ट्रेन सुरू होणार असून, यानंतर याचा पहिला थांबा इनरवा येथे आहे. त्यानंतर ही गाडी खजुरी, महिनाथपूर, वैदही, परेहा, जनकपूर आणि जनकपूर ते कुर्था या स्थानंकावर थांबले.

प्रवाशांना किती द्यावे लागणार भाडे भाड्याने पहा

नेपाळला जाण्यासाठी भाडेही निश्चित करण्यात आले असून, प्रवासासाठी सामान्य वर्गाचे भाडे 56.25 रुपये असेल तर एसी कोचचे भाडे 281.25 रुपये असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com