

Maharashtra Diesel Rules jalna
esakal
Maharashtra government diesel policy : खरीप हंगाम तोंडावर आला असताना राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे रखडली असून पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेत जालना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी अवघ्या दोन दिवसांत मागे घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
जालना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्रांसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध होणार आहे.