Farmer's Fund Scam: तहसीलदारांचं लॉगिन वापरुन तलाठी, ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे ५० कोटी रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाची झोप उडवणारा हा घोटाळा आहे. जालन्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे..Pankaj Mithal: "लॉ कॉलेज अन् विद्यापीठांमध्ये वेदांचा समावेश व्हावा"; सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पंकज मित्तल यांचं विधान.उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिसदस्यी समिती नेमली होती. या समितीनं हा घोटाळा उघडकीस आणला आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर या तक्रारींची प्राथमिक तपासणीनंतर हे लक्षात आलं की, काही ठिकाणी डुप्लिकेशन झालं आहे तसंच काही ठिकाणी बोगस याद्या जोडून अनुदान उचलण्यात आलं आहे. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर जानेवारी महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, तसंच ईजीएस डेप्युटी कलेक्टर मनिष दांडगे आणि नायब तहसिलदार लुणावत मॅडम यांचा समावेश होता. या त्रिसदस्यी समितीनं या घटनेची चौकशी केली".Mehul Choksi: तहव्वूर राणानंतर आता मेहुल चोक्सी! प्रत्यार्पणाच्या हालचाली वाढल्या, महत्वाची अपडेट आली समोर.साधारण घनसागंवी आणि अंबड तालुक्यातून साधारण ७५ ते ८० गावांमध्ये तलाठ्यांनी अपलोड केलेल्या ज्या याद्या आहेत त्याची प्राथमिक तपासणी समिती करत आहे. यामध्ये प्रत्येक तलाठी, मंडल अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना चौकशीसाठी बोलावून त्यांनी ज्या याद्या दिलेल्या होत्या त्यांची फेरतपासणी केली जात आहे. पण याची अंतिम यादी अद्याप समोर आलेली नाही..SC Sub Categorization: अनुसुचित जातींचं उपवर्गीकरण करणारं तेलंगाणा बनलं देशातील पहिलं राज्य; CM रेवंथ रेड्डी म्हणाले, ऐतिहासिक... .यामध्ये नेमकी मोडस ऑपरेंडी काय आहे? हे पूर्ण अहवाल समोर आल्यानंतरच कळू शकेल. पण यामध्ये दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे यात दुबार लाभार्थी असू शकतात, एकाच नावाच्या व्यक्तीनं दोनदा फायदा घेतलेला असू शकतो. किंवा काही कागदपत्रे आहेत त्यामध्ये छेडछाड केलेली असू शकते..Teacher Recruitment Scam: नागपूरच्या शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्वाची ऑडिओ क्लीप व्हायरल; झाला मोठा खुलासा .जालन्यात २०२२-२३ मध्ये अतिवृष्टी झाली. यावेळी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर केली होती. या नुकसान भरपाईत काही तलाठी, ग्रामसेवकांनी हात साफ केला आहे. प्रशासनानं यामध्ये घोटाळ्याचा नेमका आकडा सांगितलेला नाही पण हा आकडा ५० कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.