इंदू मिलमधील पुतळ्याची उंची वाढणार; पाहा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. सरकारने इंदू मिलमधील आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटाने वाढविण्यास मान्यता दिली आहे.

मुंबई : मुंबईतील दादर येथील इंदू मिल या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावास आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. सरकारने इंदू मिलमधील आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटाने वाढविण्यास मान्यता दिली आहे. आजच्या बैठकीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आता नगरपरिषदांमध्येही प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका काढण्याचे अध्यादेश काढण्यात आला.

गांधींवर टीका केली अन् योगेश सोमणांना पाठविले सक्तीच्या रजेवर

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :
- दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावास मान्यता.
- जागतिक बँक (IBRD) सहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (SMART) सादरीकरण.
- नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियमातील सुधारणेचा अध्यादेश काढण्याचा निर्णय.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government cabinet approve Indu Mill Babasaheb Ambedkar Memorial