Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे. पण सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे सरकारनं या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे वाटण्यासाठी आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागाचा एकूण ७ हजार कोटी रुपयांचा निधी वळवला आहे. सर्वात कहर म्हणजे या विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शवलेला असताना त्यांची विनंती धुडकावण्यात आली आहे.