

Government New Decisions for Farmers
ESakal
मुंबई : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांचे उत्पादन आणि धरणांमधील टाकाऊ पदार्थ यापुढे वाया जाऊ दिले जाणार नाहीत. यासाठी एक सुधारित धोरण सादर करण्यात आले आहे. राज्यातील सहा प्रमुख प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्त्वावर गाळ आणि वाळू काढण्यात येईल. यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढेल आणि कचऱ्याचा योग्य वापर करणेही शक्य होईल.