Maharashtra MLC Election: शिक्षक-पदवीधरसाठी मतदान संपलं; सरासरी ७२.४४ टक्के झालं मतदान

पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघात मतदान मोठ्या उत्साहात पडलं पार
Election
ElectionEsakal

Maharashtra MLC Elections : राज्यातील पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघात आज निवडणूक पार पडली. सर्व मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. यामध्ये एकूण सरासरी ७२.४४ टक्के मतदान झालं. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली.

दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. यामध्ये नाशिक विभाग (४९.२८ टक्के), अमरावती विभाग (४९.६७ टक्के), औरंगाबाद विभाग (८६ टक्के), नागपूर विभाग (८६.२३ टक्के), कोकण विभाग (९१.०२ टक्के) मतदान झालं. यामध्ये कोकण विभागात सर्वाधिक तर नाशिक विभागात सर्वात कमी मतदान झालं.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान आज पार पडले. ही निवडणूकी चुरशीची दिसून आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला असून दुसरीकडे काँग्रेसचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी ही मतदारांशी गाठी भेठी घेवून चांगला जनसंपर्क मतदार संघात वाढवल्याचे दिसून आले आहे.

Election
कोण मारणार बाजी! नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान

विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 23 हजार 412 मतदारापैंकी 11 हजार 822 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 50.50 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 35 हजार 58 मतदारापैंकी 18 हजार 33 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 18 हजार 918 मतदारापैंकी 9 हजार 385 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 49.61 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com