esakal | महाराष्ट्रात येताना नवी गाईडलाईन; कोरोना टेस्टविषयी सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra guidelines covid 19 test required while entry from kerala

दक्षिण भारतात केरळमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात येताना नवी गाईडलाईन; कोरोना टेस्टविषयी सूचना

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा चिंतेचा विषय बनली आहे. पुण्यात कोरोना आटोक्यात आल्याचं दिसत असलं तरी, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. देशात दिल्लीसह काही राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. त्यात कोरोनाचा प्रभाव असलेल्या राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करताना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

आणखी वाचा - सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं कौतुक

केरळमध्ये रुग्ण वाढले
दक्षिण भारतात केरळमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरात या राज्यामधून महाराष्ट्रात यायचं असेल तर, कोरोनाची रॅपिड टेस्ट अत्यावश्यक आहे. या यादीत आता केरळचा ही समावेश करण्यात आला आहे.

आणखी वाचा - शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींचं मौन; सत्ताधारी म्हणाले, 'शेम-शेम'

काय आहेत सूचना?
केरळमधून महाराष्ट्रात येण्यासाठी विमानात प्रवेश करतानाच प्रवाशांना कोरोनाची निगेटिव्ह टेस्ट असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. तरच त्याला विमानात प्रवेश मिळेल. नव्या एसओपीनुसार, या आदेशाची केरळ आणि महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्यांना रॅपिड टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद, मुंबई, पुणे, शिर्डी, नागपूर आणि कोल्हापूर विमानतळावर विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या प्रवाशांना कोणतिही लक्षणे नाहीत त्यांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनची अट नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.