esakal | ग्रामविकास विभागाची आरोग्य भरती, ‘न्यासा’कडेच कंत्राट; ‘टेक्निकल एरर’मुळे भुर्दंड
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य खात्यातील भरती प्रक्रियेची परीक्षा ऐनवेळी रद्द

ग्रामविकास विभागाची आरोग्य भरती, ‘न्यासा’कडेच कंत्राट

sakal_logo
By
सम्राट कदम

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागानंतर आता ग्रामविकास विभागाच्या भरती प्रक्रियेतही ‘गोंधळा’ची परंपरा दिसू लागली आहे. विशेष म्हणजे जिल्हास्तरावरील आरोग्य सेवकांची भरती करणाऱ्या या परीक्षेचे कंत्राटही ‘न्यासा कम्युनिकेशन्स’ला देण्यात आले आहे. अर्ज करत असताना टेक्निकल एरर दाखवत उमेदवारांना एका पेक्षा अधिकवेळा शुल्क भरावे लागत आहे. त्याचा त्यांना कोणताही परतावा मिळत नसल्याचे उमेदवारांनी ‘सकाळ’ला कळवले आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक व सेविका पदांसाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने भरती करण्यात येत आहे. यासाठी मार्च २०१९ मध्ये परिपत्रकही काढण्यात आले. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरले होते. पण मध्यंतरी संकेतस्थळाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे कंत्राट बदलले. त्यानंतर जुन्या कंपनीने नव्या कंपनीकडे अर्जदारांच्या माहितीचे हस्तांतर केले. परंतु, हे होत असतानाच अर्जदारांच्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाली आहे. काही अर्जदारांच्या लॉगीनवर दुसऱ्याच उमेदवाराचा अर्ज दिसत आहे. हे होत असतानाच आता शुल्का संबंधीच्या या अडचणी समोर येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा: मुंबईत दैनंदिन रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर

आरोग्य सेविका पदासाठी अर्ज करणारी वृषाली राऊत म्हणते, ‘‘मी शुल्क भरल्यानंतरही संकेतस्थळावर अर्ज पूर्ण झाला नाही. म्हटलं पुन्हा शुल्क भरावे म्हणजे प्रक्रिया पूर्ण होईल. परंतु, अजूनही अर्जाची प्रक्रिया अपूर्ण आहे.’’

उमेदवारांना आलेल्या अडचणी

काही उमेदवारांच्या संकेतस्थळावरील माहितीत गडबड

काही पदांच्या जागा कमी-जास्त झाल्यामुळे अर्जात बदल आवश्यक

उमेदवारांच्या खात्यातून पैसे जातात, परंतु अर्जाची प्रक्रिया अपूर्ण

अधिकचे पैसे परत मिळत नाही

हेल्पलाइन क्रमांकावरून यासंबंधी माहिती मिळत नाही

परीक्षा एकच तर शुल्कही एकच ठेवा

हेही वाचा: इचलकरंजीत लसीकरणाबाबत उदासिनता : हजारो डोस शिल्लक

मी आरोग्य पर्यवेक्षकासाठी अर्ज केला आहे. राज्यभरात एकच गुणवत्ता यादी आणि एकच परीक्षा होणार आहे. त्यामुळे मी साताऱ्याबरोबरच सोलापूर, पुणे आणि औरंगाबादचा अर्ज भरला, तर मला प्रत्येक जिल्ह्यासाठी ४०० रुपये आणि बॅंकेच्या शुल्कासाठी प्रत्येकी ३० रुपये अधिक भरावे लागले. म्हणजे एकाच परीक्षेसाठी

१७२० रुपये भरावे लागले. बहुतेक विद्यार्थ्यांनी सर्वच जिल्ह्यांसाठी अर्ज भरलेत, अशा विद्यार्थ्यांना तर १५-१६ हजार रुपये शुल्क भरावे लागले. एकच परीक्षा असताना वेगवेगळे शुल्क का, असा प्रश्न एका परीक्षार्थीने उपस्थित केला आहे.

आरोग्य सेवक पदासाठी मी ५३० रुपये शुल्क भरले. परंतु प्रक्रिया काही पूर्ण झाली नाही. असे दोनदा शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली. मला अधिकच्या शुल्काचा परतावाही आजपर्यंत आला नाही. हेल्पलाईनवर २१ वेळा फोन केला; पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

- रवींद्र पावर, नंदुरबार

हेही वाचा: मुंबईत दैनंदिन रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर

उमेदवारांच्या तांत्रिक अडचणींसंदर्भात संबंधित कंपनीला निर्देश दिले आहेत. काही उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण झाले असून, विभागाने हेल्पलाइन क्रमांकही जाहीर केला आहे.

- विजय चांदेकर, अव्वर सचिव, ग्रामविकास विभाग, राज्य सरकार

तुमचा काय अनुभव...

ग्रामविकास विभागाच्या आरोग्य भरतीचे कंत्राटही ‘न्यासा कम्युनिकेशन्स’ला दिले आहे. मात्र, अर्ज करताना उमेदवारांना एका पेक्षा अधिकवेळा शुल्क भरावे लागते. त्याचा परतावाही मिळत नाही. असाच अनुभव तुम्हालाही आला आहे का? तुमची प्रतिक्रिया नावासह आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा..

नंबर- ८४८४९७३६०२

loading image
go to top