
राज्यात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालीय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलीय. तर मुंबईत सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील २४ तास राज्यात हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिलाय. येत्या 24 तासात मुंबई, पुण्यासह, कोकण किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.