Maharashtra Heavy Rain Alert :
esakal
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाचा जोर आणखी किमान ४८ तास कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रातून येणारे दमदार आर्द्र वारे आणि उत्तर भारतातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथा, मुंबई महानगर परिसरासह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.