
राज्यात मॉन्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावलीय. मुंबई, पुण्यासह सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरुवात झालीय. पावसाचा हाच जोर मंगळवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट दिलाय. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आलाय.