Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार ; कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रासाठी 'ऑरेंज अलर्ट'

Maharashtra Rain Alert issued with heavy rainfall expected: याचबरोबर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alertesakal
Updated on

Heavy Rainfall Predicted in Maharashtra: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज (बुधवार) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळल्या. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. तर उद्या (गुरुवार) कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आलेला आहे.

याचबरोबर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान आहे.

बुधवारी सकाळपासून विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ हवामान होते. उर्वरित राज्यात उन सावल्यांच्या खेळात पावसाच्या सरी येत होत्या. तर आज (गुरूवार) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert
OBC Reservation: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता ‘ओबीसीं’साठीही स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

 मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, जळगाव, बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत जोरदार सरींची, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Rain Alert
India government Decision: केंद्र सरकारने पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांगलादेशमधून आलेल्या पीडित अल्पसंख्यांकांबाबत घेतला मोठा निर्णय!

उत्तर ओडिशा आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली आज (ता. ३) झारखंडकडे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर पासून, जयपूर, दामोह, पेंद्रारोड, संबलपूर, ठळक कमी दाबाचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com