
Heavy Rain Alert in Maharashtra, Farmers in Marathwada and Vidarbha Affected : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय. मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. मुंबई, पुणे घाटमाथा, कोकण, रायगड आणि पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.