Home Gaurds: खुशखबर! महाराष्ट्रातील होमगार्ड्ससाठी महत्वाचा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

Homegaurds Maharashtra : देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे. यामध्ये होमगार्ड्ससाठी सलग ६ महिने कामाची तरतूद करण्यात आली.
Home Gaurds: खुशखबर! महाराष्ट्रातील होमगार्ड्ससाठी महत्वाचा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

Maharashtra Homegaurds news: महाराष्ट्रातील होमगार्ड्ससाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३५० कोटी रुपयांची तरतूद करुन होमगार्ड्सला ६ महिने काम दिले जाणार आहे. याआधी महाराष्ट्रातील होमगार्ड्सला वर्षभरात १८० दिवस कामासाठी मिळत होते. बाकीच्या राज्यांमध्येही गृहरक्षक दलातील जवानांना सलग ६ महिने ड्युटी मिळते.

मात्र, महाराष्ट्रातील गृहरक्षक दलातील जवानांना इतक्या दिवस कामाची तरतूद नव्हती. मात्र, आता त्यांच्या कामाच्या दिवसांमध्ये वाढ केली जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर जवानांना कवायत भत्ता देण्याचीही घोषणा यावेळी त्यांनी

सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी होमगार्ड्सचा हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहासमोर मांडला. यावेळी त्यांनी गृहरक्षक दलासाठी ३५० कोटींची तरतूद जाहीर केली. याआधी ही तरतूद १७५ कोटी इतकी होती.

यावेळी ते म्हणाले की, "होमगार्ड ही स्वेच्छित सेवा आहे. इतर राज्यात १८० दिवस काम दिले जाते ,पण आपल्या राज्यात दिले जात नाही. माझ्या सरकारच्या काळात आपण १८० दिवस लागू केले होते, पण आर्थिक अडचणी पायी हे परत थांबवले गेले. होमगार्ड ची खूप मदत होते पण आता ३५० कोटी रुपयांची तरतूद करुन सलग ६ महिने होम गार्डना आता काम दिले जाईल. दर तीन वर्षांची नोंदणी बंद केलीये. त्यांच्यासाठी कवायत भत्ता देखील मंजूर केलाय."

Home Gaurds: खुशखबर! महाराष्ट्रातील होमगार्ड्ससाठी महत्वाचा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
Devendra Fadnavis : अधिकारी संरक्षण कायद्यात तीन महिन्यांत बदल करणार - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असेल, वाहतुक पोलीसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलांतील जवानांना ड्युटी दिली जाते. सध्या पोलीसांना कायदा व सुवव्यवस्था राखण्यात मदत करण्यासाठी या जवानांची मदत घेतली जाते. त्याचबरोबर एखाद्या आरोपीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात किंवा त्यांना वैद्यकीय मदतीसाठी ने-आण करण्यात होमगार्ड्सची मदत होते.

महाराष्ट्रात वेळोवेळी या होमगार्ड्स जवानांना वर्षभर काम देण्याची मागणी करण्यात आली होती, त्याचबरोबर त्यांना निश्चित वेतन मिळावं यासाठीही प्रयत्न सुरु होते. सध्या होमगार्ड्सला कोणत्याही प्रकारचे निश्चित वेतन नाहीये. ज्या दिवशी काम असते, त्याच दिवसाचे पैसे त्यांना मिळतात. इतर दिवशी त्यांना रोजगाराचे दुसरे साधन शोधावे लागते.

Home Gaurds: खुशखबर! महाराष्ट्रातील होमगार्ड्ससाठी महत्वाचा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
Rohit Pawar : अजितदादा मविआचे नाही तर महायुतीचे उपमुख्यमंत्री; भाजप आमदार राम शिंदे असं का म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com