Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana payment date
esakal
Ladki Bahin Yojana Latest Update : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांचे पुढील हप्त्याकडे लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस महिलांच्या बँक खात्यात जमा झाला (Ladki Bahin Yojana September installment latest news) होता. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे दसऱ्याच्या सणाला १५०० रुपये मिळणार की दिवाळीत दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये खात्यात जमा होणार, याबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे.