पडीक जमीनीबद्दलच्या विधानाचा विपर्यास, बावनकुळेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, शेतकऱ्यांशी संबंध नाही

Maharashtra Land Rule: सलग तीन वर्षे जमीन पडीक राहिल्यास शासनाच्या व्यवस्थापनाखाली येणार असं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यावर आता बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Maharashtra Barren Land Policy:

Maharashtra Barren Land Policy:

Esakal

Updated on: 

राज्यातील पडीक जमिनींबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे. पडीक जमिनी शासनाच्या व्यवस्थापनाखाली घेण्याच्या निर्णयाचा मूळ शेतकऱ्यांशी किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही. ज्यांनी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर जमिनी खरेदी करून त्यावर फार्महाऊस बांधले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जमीन पडीक ठेवली आहे. अशा लोकांसाठी हा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

Loading content, please wait...