

Latest Marathi News Live Update
esakal
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात मासेमारी करण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या नागरिकाचा मृतदेह शोधण्यात पोलिस प्रशासन व रेस्क्यू पथकाला यश आले. गुरुवार ता. 9 रोजी सायंकाळी माणिकडोह धरणात काळू कृष्णा सांगडे वय 59 वर्षे रा. हडसर ता. जुन्नर हे त्यांचे सहकारी युवराज मारुती सांगडे यांच्यासोबत मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान काळू कृष्णा सांगडे हे माशांचे जाळे सोडण्यासाठी पाण्यात उतरले होते. काही वेळानंतर पाण्यावर टायर ट्यूब तरंगताना दिसल्यानंतर काळू सांगडे हे पाण्यामध्ये कुठेही दिसत नसल्याने युवराज सांगडे यांनी घडलेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व रेस्कु पथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. शुक्रवार ता. 10 रोजी सकाळी 11 च्या सुमारास बुडीत व्यक्तीचा मृतदेह शोधण्यास प्रशासनाला यश आले.