Maharashtra Elections: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येत्या चार महिन्यात राज्यात रखडलेल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या ताकदीची चाचपणी सुरु झाली आहे. त्याअनुषंगानं भाजपचा अजेंडा समोर आला आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या महत्वाच्या शहरांच्या आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबाबतचे संकेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते अमित शहा यांनी दिले आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.