Latest Marathi News Live Update: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 1 October 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
 live Updates news in marathi
live Updates news in marathiesakal
Updated on

Pune Live : पिंपरी-चिंचवडमध्ये डबल डेकर बस धावणार

पिंपरी चिंचवड शहरात लवकरच डबल डेकर बस धावणार आहे. याबाबत चाचणी पार पडली आहे.

Maharashtra Live : राज्यात आता दुकानं, हॉटेल्स आणि इतर आस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार

मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार वगळून इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू राहणार आहेत याबाबत राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Ahilyanagar Live :  पोलीस पडताळणीत अहिल्यानगर पोलिसांची निलेश घायवळला क्लिनचिट

परदेशात फरार झालेल्या पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट देण्यात पोलिसांच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहेपोलीस पडताळणीत अहिल्यानगर पोलिसांची घायवळला क्लीन चीट दिल्याचे समोर आले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने तयारीला सुरूवात केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

पाचवे झाडीपट्टी नाट्यसंमेलन

झाडीपट्टी रंगभूमीवरील सर्वात मोठा सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचव्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. हा सोहळा ४ व ५ ऑक्टोबर २०२५ देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११. ३० वाजता होणार असल्याची माहिती चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व नाट्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी दिली. तसेच या संमेलनाला सिनेअभिनेता व हास्यसम्राट भारत गणेशपुरे (चला हवा येऊ द्या फेम) यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचेही सांगितले.

तीर्थपुरीत धनगर समाजाचे एसटी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

धनगर समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची ठिणगी आता गावोगावी पेटू लागली आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बुधवार (ता. एक ) सकाळी दहाच्या सुमारास धनगर बांधवांनी अंबड–तीर्थपुरी मार्गावर डाव्या कालव्याच्या पुलावर रस्तारोको करत सरकारविरोधात संतप्त घोषणाबाजी केली. तब्बल तासभर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Nashik News: सप्तशृंगी गडावर कीर्तीध्वजाची मिरवणूक

महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवा आज महानवमीचा उत्सवात नवरात्रात प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरतीच्या लाटा उसळल्या गेल्या. नवरात्री उत्सवातील सर्वोच्च क्षण असलेल्या सप्तशृंगी मंदीराच्या शिखरावर मध्यरात्री भगवतीचा किर्तीध्वज डौलत फडकणार आहे.

Mumbai Crime: मुंबईत व्यक्तीवर दोन अज्ञात व्यक्तींकडून चॉपरने हल्ला

आज सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास, विल्सन बारेटो (वय ५२) या व्यक्तीवर दोन अज्ञात व्यक्तींनी चॉपरने हल्ला करून त्यांच्याकडील VIVO कंपनीचा स्मार्टफोन लुटून नेला. या घटनेनंतर नवघर पोलीस ठाणे, मुलुंड येथे संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गंभीर जखमी झालेल्या विल्सन बारेटो यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Mumbai News: एका सार्वजनिक शौचालयात जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले

भांडुपच्या तुलशेत पाडा परिसरातील पाटकर कंपाउंड मधील एका सार्वजनिक शौचालयात नुकतच जन्मलेला स्त्री जातीचा अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली. महिलांच्या शौचालयामध्ये एका कमोड मध्ये या अर्भकाला टाकण्यात आलं होतं. त्यानंतर परिसरातील महिला हे शौचालय वापरण्यासाठी गेल्या असता त्यांना हे अर्भक आढळून आलं. त्यानंतर या महिलांनी स्थानिकांच्या मदतीने या अर्भकाला भांडुप रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी अर्भकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात सध्या या अर्भक ची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या डोक्याला थोडीशी दुखापत झाली होती. परंतु हे अर्भक नेमकं कोणी या शौचालयात आणून टाकलं. याचा शोध सध्या भांडुप पोलीस घेत आहेत. स्थानिकांच्या समय सूचकतेमुळे या चिमुकल्याचा जीव मात्र वाचला आहे.

Mumbai Live : भाईंदरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी गजाआड

भाईंदर पश्चिम येथील राईगाव तलाव परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली. एका चाळीच्या खोलीत हा जुगार अड्डा चालत होता.

या धाडीत पोलिसांनी १८ जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ७५ हजार रुपयांची रोकड आणि १८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

झोन १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण (आयपीएस) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर त्यांनी विशेष पथक तयार करून ही यशस्वी कारवाई केली.

Nashik Live : नाशिकमधील गुन्हेगारीविरोधात शिवसेना-भाजप आमदार आक्रमक!

नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाचे आमदार आता मैदानात उतरले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेपाठोपाठ आता भाजपचे आमदारदेखील आक्रमक झाले असून त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला आहे.

नाशिक शहरातील तिन्ही भाजप आमदारांनी गुन्हेगारी नियंत्रणाबाबत थेट भूमिका घेतली आहे. भाजपच्या देवयानी फरांदे, राहुल ढिकले आणि सीमा हिरे या आमदारांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासोबत तातडीची बैठक सुरू केली आहे.

या बैठकीत शहरात वाढलेले चोरी, लूटमार आणि इतर गंभीर गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी हे आमदार करत आहेत.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ४ ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक

- बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित

- बैठकीत सरकारसोबत सकारात्मक तोडगा निघाला तर 10 तारखेला निघणाऱ्या मोर्चात सरकारच मत सकारात्मक असल्याचं जाहीर करणार

- 2 सप्टेंबरला सरकारने काढलेला जीआर हा अन्यायकारक आहे असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

ST Bus Fare: एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द

एसटी महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढ रद्द.

दिवाळीनंतर १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली होती भाडे वाढ.

Maharashtra Flood: शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी एक लाख 11 हजार रुपयांची मदत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघ, जावली विधानसभा मतदारसंघ आणि सातारा शहर शिवसेना यांच्या वतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विकास शिंदे उपजिल्हाप्रमुख, सातारा, नीलेश मोरे शहर प्रमुख सातारा यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला.

Uddhav Thackeray Live: संकटात राजकारण न आणता एकत्र यावं - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट

दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

सरकारने संकटात राजकारण न आणता एकत्र यावं. - उद्धव ठाकरे

शेतकरी ओझ्याखाली दबले गेले आहेत. - उद्धव ठाकरे

cch. sambhajinagar : मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे.

मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार की नाही राहणार अशी चर्चा सुरू झाली होती.

मात्र जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी माहिती दिली आहे की, मनोज जरांगे पाटील स्वतः दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

कोणीही संभ्रम बाळगू नये त्यांच्या वरती उपचार सुरू आहेत.

लवकरच त्यांची प्रकृती ठीक होईल आणि नगद नारायण महाराज चरणी देखील त्यांनी प्रार्थना केली आहे. की लवकरच प्रकृती र्ती ठीक होईल.

Tuljapur Live :  तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ

तुळजाभवानी मंदिरासमोर सुरक्षारक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यात धक्काबुक्की

मातंग समाजाच्या आरक्षण मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेची तुळजापुरात साकडं यात्रा

तुळजाभवानीला आरती करून आरक्षणाचे मागणीसाठी साकडं घालण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते तुळजापुरात

मंदिर सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये मंदिराच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की

मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारावर सोडण्याच्या कारणावरून बाचाबाची आणि धक्काबुक्कीने प्रचंड गोंधळ

Gadchiroli Live : पोस्टे कटेझरी हद्दीतील माओवादी स्मारक गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट

दुर्गम-अतिदुगम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्टया संवेदनशील आहे.

येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती.

मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणा­या प्रभावी माओवादविरोधी अभियानांमुळे जिल्ह्रातील सामान्य नागरीकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भिती कमी होताना दिसून येत आहे.

याच प्रकारे माओवाद्यांच्या भूतकाळातील हिंसाचाराचे प्रतीक असलेले पोस्टे कटेझरी हद्दीतील दोन ते तीन वर्ष जुने मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले स्मारक गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नष्ट केले आहे.

Dharashiv Live : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील दसरा मेळाव्याला येणार नाहीत

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील दसरा मेळाव्याला येणार नाहीत

पूरग्रस्तांना मदतांनाच मदत करा असे उद्धव ठाकरेंनी सांगितले

धाराशिवला पूराचा मोठा फटका बसला

हजारो हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसान झाले

Nashik Live : दसऱ्या मेळाव्यासाठी नाशिकहून ठाकरेंच्या शिवसेनेचे हजारो शिवसैनिक मुंबईला जाणार

- मुंबईतील दसऱ्या मेळाव्यासाठी नाशिकहून ठाकरेंच्या शिवसेनेचे हजारो शिवसैनिक मुंबईला जाणार

- नाशिक शहर आणि जिल्ह्यातून शेकडो वाहनांच्या माध्यमातून मोठं शक्तीप्रदर्शन करत शिवसैनिक मुंबईला जाणार

- मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार तयारी

- विचारांचं सोनं लुटण्यासाठी मुंबईला जाणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिक्रिया

Pune Live : पुणे पोलिसांकडून आता निलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला याचा शोध सुरू 

पुणे पोलिसांकडून आता निलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला याचा शोध घेत आहे. पासपोर्ट मिळवण्यासाठी नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जो पत्ता देण्यात आला होता त्या पत्त्यावर जाऊन पुणे पोलिसांनी तपास केला. त्यानंतर हे पथक नगरच्या पोलीस मुख्यालयात जाऊन निलेश घायवळने पासपोर्टसाठी नक्की कोणती कागदपत्रे जमा केली होती याचाही तपास करणार आहे. या पासपोर्टसाठी निलेश घायवळ ने पत्ता पुण्यातील दीलाय , मात्र त्यासोबत जोडलेले आधारकार्ड पुण्यातील कोथरुडच्या पत्त्यावर चे आहे.

शिवाय निलेश घायवळला ज्याच्या कार्यकाळात पासपोर्ट मीळाला त्या पोलीस निरिक्षक विकास वाघाला पुढे २०२१ मधे बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि निलंबन करण्यात आले. एका महिलेने वाघच्या विरोधात बलात्कार आणि मारहाणीची तक्रार दिली होती...

Liveupdate: गुंड निलेश घायवळ च्या घरातील सदस्य गायब

निलेश घायवळ चा भाऊ दोन मुलं आणि बायको घरात नसल्याची पोलिसांची माहिती निलेश घायवळच्या पुण्यातील आणि नगर जिल्ह्यातील घरातून नातेवाईक गायब निलेश घायवळ मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांकडून दोन्ही ठिकाणी नातेवाईकांचा शोध सुरू निलेश घायवळ परदेशी गेला असून त्याच्या बनावट पासपोर्टचा तपास पोलीस करत आहेत बनावट पत्ता देऊन फसवणूक केल्याप्रकरणी निलेश घायवळवर पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता .या अगोदर गाडीवर बनावट नंबर वापरला आणि मोका अंतर्गत निलेश घायवळ कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

LiveUpdate: जालन्यातील घनसावंगीत मेंढ्यासह धनगर समाज रस्त्यावर; आंदोलन सुरु

जालन्यातील घनसावंगीत मेंढ्यासह धनगर समाज रस्त्यावर उतरला.जालन्यात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केलंय. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या अंमलबजावणीसाठी घनसावंगीतील बोडखा टी पॉईंटवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलाय यावेळी दोन तास रस्त्यावर मेंढ्या बसवत हा रास्ता रोको करण्यात आलाय यावेळी वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या..

Liveupdate: एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरामध्ये धनगर समाजाकडून चक्काजाम आंदोलन

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात दिपक बोऱ्हाडे यांच आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पंधरावा दिवस असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राज्यभरामध्ये धनगर समाजाकडून ठीकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा उद्यापासून उपोषण अधिक तीव्र करणार असा इशारा धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांनी दिला आहे.

Rohit Pawar Live Update: पावसामुळे २६ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले, त्यात सर्वाधिक नुकसान मराठवाड्याचे झाले आहे - रोहित पवार

रोहित पवार :

  • २६ लाख हेक्टर नुकसान महाराष्ट्रात झाले त्यात सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाले आहे.

  • आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ज्या अडचणी आहेत, त्या सांगितले.

  • पंचनामे करावे, जमीन खरडून गेलेली आहे त्याची भरपाई देण्याची मागणी आम्ही केली आहे.

  • मुलांची शाळेची, महाविद्यालयाची हॉस्टेलची फिस माफ करण्याची मागणी केली आहे.

Kolhapur Live Update: ठेकेदार शशिकांत दिलीप पोवार याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • कोल्हापुरातल्या फुलेवाडी येथील महापालिकेच्या फायर ब्रिगेडच्या बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीचा स्लॅप कोसळल्याचे प्रकरण

  • ठेकेदार शशिकांत दिलीप पोवार याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • याबाबतची फिर्याद मनपा कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली

  • काल रात्रीच्या घटनेत एक जण मयत तर पाच जण जखमी झाले होते

  • भारतीय न्यायसंहिता कलम 2023 चे कलम 105, 125 (ब) प्रमाणे जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल

Maratha Reservation Live: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा तीव्र होणार; आज कोल्हापुरात आंदोलनाचे शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट आणि पेनचे पूजन

  • मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा होणार पुन्हा तीव्र

  • आज कोल्हापुरात आंदोलनाचे शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट आणि पेनचे पूजन

  • खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते गॅझेट आणि पेनचे पूजन

  • इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची देखील उपस्थिती

  • कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपात कोल्हापूर गॅझेट आणि पेनचे पूजन

Nashik Live: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सोने बाजाराला झळाळी

नाशिक -

- दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सोने बाजाराला झळाळी

- सोन्याचे दर १ लाख २१ हजार रूपये प्रति तोळा रुपयांवर

- दर वाढून देखील मागील वर्षाच्या तुलनेत २० ते ३० टक्के अधिक सोन्याची बुकिंग

- सोन्याच्या दर वाढीमुळे जास्त वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी कमी वजनाच्या दागिने खरेदीचा बाजारात ट्रेंड

- ग्राहकांच्या मागणीनुसार कमी वजनाचे सोन्याचे आकर्षक डिझाईन्सचे दागिन्यांची ग्राहकांना भुरळ

- गुंतवणूक म्हणून देखील सोने खरेदीकडे नाशिककरांचा कल

- सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची होतेय गर्दी

- दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता

Chhatrapati Sambhajinagar Live: पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन

पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन येथे धनगर समाजाचे वतीने चक्काजाम आंदोलन

दिपक बोऱ्हाडे यांच्या वतीने सुरु असलेल्या आरक्षण उपोषणाला पाठिंबा, शासनाने दखल घेतली पाहिजे याकरिता आज बिडकीन येथील पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धनगर एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करिता चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

सरकारच्या वतीने वारंवार धनगर समाजाला डावलले जात आहे.

Latest Marathi News Live Update: राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न -राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले, पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केला आहे

यावर्षी उसाचे उत्पादन 10 ते 12 टनाने घटलेला आहे हे सरकारला माहिती आहे

महापुरामध्ये आणि अतिवृष्टी मध्ये उसाचे देखील नुकसान झालेले आहे असं असताना टनाला पंधरा रुपयांचा दरोडा ऊस उत्पादकांवर पडतोय

जिथे ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफ आर पी मिळू नये म्हणून राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जातं तेच राज्य सरकार पूर बाधितांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर जर टनाला पंधरा रुपयांचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला मान्य नाही

यामध्ये टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत

सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही सरकार हे कारखाना धार्जिन झालेला आहे

पुणे ब्रेकिंग : पुण्यातील गुन्हेगारांचा कोथरूड नवीन "अड्डा"? पिस्तूल, हत्यारांसह सोसायटीमध्ये शिरले गुंड

पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार प्रकरणी पोलिस कारवाई करत असतानाच आता आणखी एक प्रताप याच भागातून समोर आला आहे.

कोथरूड परिसरात असणाऱ्या एका इमारतीत २ गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

विशेष म्हणजे कुठलाही धाक न बाळगता या गुंडांनी चक्क सी सी टिव्ही मध्ये पिस्तूल आणि हत्यार दाखवत दहशत माजवली.

नेमकं कुठल्या उद्देशाने हे दोन गुंड या सोसायटी मध्ये शिरले होते याचा तपास सुरू आहे.

या गुंडांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची पोलिसांकडे मागणी करण्यात आली...

Jalna Live : धनगर समाज आरक्षणाच्या मुद्दावरून आक्रमक

धनगर समाज आरक्षणाच्या मुद्दावरून आक्रमक, अंबड - पाचोड रस्त्यावरती शिरनेर गावाजवळ रस्ता रोको

रस्त्यावरती टायर पेटवत केला सरकारचा निषेध...

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय..

जालन्यामध्ये धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पंधरावा दिवस आहे..

दिपक बोऱ्हाडे यांनी राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा आवाहन धनगर समाजाला केलं होतं...

यानंतर जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे...

Maharashtra Live : राज्यात शंभर टक्के पीक पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, एक ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात पीक पाहणी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने 100 टक्के पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी,असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

खरीप हंगाम 2025 साठी ही पीक पाणी महत्त्वाची.

Maharashtra Live : दसऱ्यानंतर अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर

५ ऑक्टोबर रोजी अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर

लोणी आणि कोपरगाव येथील विविध कार्यक्रमांना हजेरी...

प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे शहा यांच्या हस्ते लोकार्पण...

यासह शहा यांच्या हस्ते लोणी येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण...

लोणी बाजारातळ येथे आयोजित सभेस अमित शहा करणार मार्गदर्शन...

Ratnagiri Live : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले,

रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापदी पदासाठी आरक्षण जाहिर

मंडणगड संगमेश्वर लांजा पंचायत समिती सभापतीसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण

रत्नागिरी चिपळूण गुहागर आणि खेड पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण (ओपन) गटासाठी आरक्षण

दापोली पंचायत समिती सभापती साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर राजापूर पंचायत समिती सभापती साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षण

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली आरक्षण सोडत

रत्नागिरी जिल्ह्यात ९ पंचायत समित्या, सभापती पदाच्या आरक्षण सोडती नंतर सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी

Latur News Udpates : अतिवृष्टीचा फळबागांनाही फटका, पुराच्या पाण्यात बाग गेली वाहून

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती पिकांबरोबर, फळबागांना देखील मोठा फटका बसलाय. विशेषता नदीकाठची फळबाग पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. लातूरच्या कासारखेडा शिवारात मांजरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन एकर भाग पाण्यात होती. मात्र पूर ओसरला आणि आता जागेवरच पेरून साडीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच प्रचंड मोठ नुकसान झालं आहे.

Shegaon News Updates : पावसानं नुकसान, शेती परवडेना; शेतकऱ्यानं 2 एकरातलं पीक पेटवलं

सततच्या पावसाने जवळपास सर्वच पिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परवडत नाही. शेगाव तालुक्यातील लासुरा येथील शेतकरी आनंद जवंजाळ यांनी आपल्या दोन एकर शेतात उडीद पिकाचे उत्पन्न घेण्याचं ठरवलं होतं पीकही चांगल आलं होतं. मात्र हातात तोंडाशी आलेल्या उडीद पिकाला सततच्या पावसाने मोठा फटका बसला व त्यामुळे उत्पादन खर्च परवडत नसल्याने आनंद जवंजाळ यांनी दोन एकर शेतातील उडीद पिकाच्या सुडीला स्वतःच आग लावून पेटवून दिलं.

राज्यात १०० टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्यात एक ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात १०० पीक पाहणी होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने 100 टक्के पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी,असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश खरीप हंगाम 2025 साठी ही पीक पाणी महत्त्वाची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com