Latest Marathi News Live Update
esakal
राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील एकूण २१४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील ८६९ अपघात प्रवण क्षेत्रांवर (ब्लॅक स्पॉट्स) ९२३ कोटी रुपये खर्चून एकात्मिक वाहतुक व्यवस्थापन प्रणाली बसविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समिती आणि रस्ते सुरक्षा नियंत्रण समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी हे वाहतूक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे.