कोल्हापूर जिल्हासह शहरात पडलेल्या अति मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील उपनगर आणि अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. यामुळे अनेक घरांसह प्रापंचिक साहित्यांचे नुकसान झालेलं आहे. शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनी इथल्या सुभाष आप्पासाहेब घाडगे आणि शुभांगी सुभाष गाडगे यांच्या घरामध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते. त्यांचे रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.