नागपूरच्या तरुणीसोबत मनालीत झिप लायनर तुटून अपघात झाला आहे. त्रिशा बीजवे असं या जखमी तरुणीचं नाव आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 8 जूनला झाला अपघात होता, सध्या नागपुरात खाजगी रुग्णलायत उपचार सुरू. झिप लाइनर कमरेचा असलेला बेल्ट तुटल्याने ३० फूट खाली पडली. त्यामुळं पायाला अनेक फ्रॅक्चर झालेत. नागपूरमधील पर्यटनाला 8 जूनच्या पूर्वी उन्हाळी सुट्ट्यात पती पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनाली येथे गेले होते. 8 जूनला झिप लायनरवर पर्यटन करताना दुर्घटना घडली आहे.