‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेला प्रेरणा देणारी ‘वृक्षाथॉन २०२५’ ही मॅरेथॉन स्पर्धा यंदा एक जून रोजी पुण्यात पार पडणार आहे. पुणे पोलिस, वन विभाग आणि वृक्षाथॉन फाउंडेशन यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.