बेस्ट को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. एकूण 15,090 मतदारांपैकी 12,360 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे मतदान मुंबईतील तब्बल 33 डेपोमध्ये पार पडले. या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे समर्थित उत्कर्ष पॅनल यांच्यात तसेच भाजपाचे प्रसाद लाड यांच्या पॅनलमध्ये थेट लढत रंगली आहे. निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.