आमदार क्षितिज ठाकूर, प्रतीक ठाकूर आणि इतर 5-6 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आमदार विनोद तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा गुन्हा दाखल केला. शिवसेना (शिंदे गट) नेते सुदेश चौधरी यांनी क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विवांता हॉटेलमध्ये मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कलम 118 (1), 189 (2), 189 (3) आणि 115 अंतर्गत हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.