

Latest Marathi News Live Update
भविष्यात येणाऱ्या आठ हजार नव्या बससाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कंत्राटी पद्धतीने १७ हजार ४५० चालक व साहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होईल,’’ अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये इतके किमान वेतन मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.