शिरूर बसस्थानकावरील गर्दीचा गैरफायदा घेत बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या आजूबाजूला पाळत ठेवून तीच्याकडील पर्समधील रूमालात बांधलेले मंगळसूत्र व कर्णफूले असे पाच लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पलायन केलेल्या दोन महिलांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गु्न्हे शाखा व शिरूर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने गेले आठ दिवस अखंड मेहनत करून, शंभरहून अधिक सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करीत ही कारवाई केली.