
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी वैष्णवीच्या वडिलांसह कुटुंबियांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद घडवून आणला. मुख्यमंत्र्यांनी वैष्णवीच्या वडिलांशी व्हिडीओ कॉलवर बोलून माहिती घेतली. गिरीश महाजन यांच्याकडे तुम्हाला हव्या त्या वकिलांची नावे द्या, मी माहिती घेतो असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना सांगितलं.