भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्यात दिल्लीत दीड तास बैठक पार पडली. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. .राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची उद्या दुपारी मुंबईत बैठक बोलावली आहे. .लाडक्या बहिणीचे खरे शिल्पकार अजित दादा आहेत, त्यांना मुख्यमंत्री करा. पाहिले अडीच वर्षे अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षातील अल्पसंख्याक पदाधिकारी वसीम बुऱ्हाण यांनी केली आहे..शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील उच्च पदस्थ मंत्री मुंबईत येणार आहेत. ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यातील शपथविधीसाठी अनेक केंद्रीय मंत्री उपस्थिती लावणार आहेत. .अखेर ठरलं! महायुती सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे, अशी चंद्रशेखर बावनकुळेंनी माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. .अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रचारादरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. .काँग्रेस पक्षाची बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस. पक्षाविरोधात आणि नाना पटोले यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानं नोटीस पाठवली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगितले आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी महाराष्ट्राशी संबंधित खलबतं भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे नड्डा यांच्या घरी दाखल महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा.महायुती ला विधानसभेत मिळालेल्या जोरदार यशानंतर महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्ष आणि संघटनांकडून ईव्हीएम विरोधात पुन्हा प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. दादर रेल्वे स्थानकाबाहेर भीम आर्मी ने ईव्हीएम मशीन हटाव आंदोलनाचे आणि स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी काही वेळातच हे आंदोलन थांबविले. यामुळे भीम आर्मीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणाबाजी करू लागले. मात्र पोलिसांनी लगेचच या आंदोलकांना ताब्यात घेतले. आम्ही आमचा हा विरोध असंच ठेवणार आहोत, जिथे शपथ विधी होईल तिथे घुसून आंदोलन करणार असा इशारा भीम आर्मिने या वेळी दिला..दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय पळून जाताना बॅरिकेड्स तोडून 2-3 गाड्यांचे नुकसान देखील केले आहे. अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. सभ्यसाची निशांक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.तक्रारदार पोलीस हवालदार जयवंत मोरे हे सहार वाहतूक विभागात कार्यरत असून ते गोखले पुलाजवळ तपासणी करत होते. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची होंडा कार आली, ज्याच्या ड्रायव्हरने मुद्दाम कार रस्त्यावर वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..उद्धव ठाकरेंचा हट्ट मान्य करुन बाबा आढावांनी उपोषण सोडले..इंदापूर अर्बन बँकेवरती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वविधानसभा निवडणुकीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांना सोडचिठ्ठी देत दत्तात्रय भरणे यांना देवराज जाधव यांनी दिला होता पाठिंबादेवराज जाधव यांचे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी पंचक्रोशीत मोठे राजकीय प्रस्थदेवराज जाधव यांच्या कारकिर्दीत 27 वर्षानंतर इंदापूर अर्बन बँकेला मिळाला होता अ वर्गाचा दर्जानुकत्याच विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांच्या विजयात जाधव यांचा मोलाचा वाटा .विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचा आरोप फुले वाड्यात आढावांचे ईव्हिएमविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरु उध्दव ठाकरे बाबा आढावांच्या भेटीला .बीजेएस राष्ट्रीय अधिवेशन 2024 ला संबोधित करताना, भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जोपर्यंत आम्ही पाण्याचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपवू शकत नाही. महाराष्ट्रात नेहमीच 50% पाण्याची कमतरता आहे आणि जलसंधारण ही एकमेव गोष्ट आहे जी ही समस्या सोडवू शकते... 2020 मध्ये, केंद्र सरकारने एक पाणी सारणी अहवाल तयार केला ज्यामध्ये भारतातील सर्व राज्यांमध्ये, परंतु महाराष्ट्रातील पाण्याची पातळी खाली गेली आहे हे एकमेव राज्य होते ज्यात पाण्याची पातळी वाढली होती...".विलुप्पुरमच्या मारकनममध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा दिसला. MD नुसार, #CycloneFengal 30 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 70-80 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह 90 किमी प्रतितास वेगाने चक्री वादळ म्हणून कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरी जवळ येईल..''जीडीपीचा आकडा नक्कीच घसरला आहे. जुलै-सप्टेंबर 2024 या तिमाहीत जीडीपीची सुमारे 6.5 टक्के होता आणि जर तुम्ही मागील तिमाहीच्या पार्श्वभूमीवर बघितले तर तो 6.7 टक्क्यांवर आला होता. आणि वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर, गेल्या जुलै-सप्टेंबरमध्ये तो 8.1 टक्क्यांवर आला आहे. मॅन्युफॅक्चरिंग हा उद्योगातील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. या वेळी आम्हाला असे आढळून आले आहे की वार्षिक आधारावर 2.2 टक्के वाढ झाली आहे..." इन्फॉर्मरिक्सचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मनोरंजन शर्मा यांनी सांगितले. .लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, "वायनाडच्या लोकांमध्ये इतरांमध्ये विश्वास निर्माण करण्याची ताकद आहे... 5 वर्षांपूर्वी तुम्ही मला तुमचा नवा खासदार म्हणून निवडून दिले आणि आता माझी बहीण इथली नवीन खासदार आहे..ईव्हीएम हॅक करता येत त्यांनी करून दाखवाव असे रावसाहेब दानवे म्हणाले आहे. .सोमवारी भाजपच्या नेता निवडीसाठी बैठक सर्व आमदार मुंबईत उद्या आणि परवा दाखल होतील.भाजप विधिमंडळ गटाची सोमवारी दुपारी बैठक होईल त्यानंतर सरकार स्थापनेला गती येईल.महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल असेही स्पष्ट करण्यात आला आहे..उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विकसित भारत 2047: व्हिजन ऑफ न्यू इंडिया 3.0 परिषदेला केलं संबोधित..राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि एकेकाळचे महायुतीतील घटक असलेल्या महादेव जानकर यांनी आपणाला महायुतीचा खूप वाईट अनुभव आला असल्याचं म्हटलं आहे. शिवाय यामुळेच महायुतीतून बाहेर आलो असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी आपणाला अद्याप काँग्रेसचा अनुभव नाही. त्यामुळे आता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका घेतल्याचंही स्पष्ट केलं..मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे, त्यामुळं मी त्यांच्यातून बाहेर आलो. काँग्रेसला अजून मी चाखलं नाही, त्यामुळं त्यांच्याकडं न जाता स्वतंत्ररित्या पुढं जायची आमची भूमिका आहे. त्यामुळं येत्या काळात आमची एकला चलोची भूमिका असेल असं म्हणत असतानाच माझ्या पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू, असा इशारा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्याच पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना दिला आहे. .राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत रस्त्यांच्या कडेला भिंतीवर ईव्हीएमच्या विरोधात स्लोगन लिहण्यात येत आहेत. ओबीसी सेल अध्यक्ष राज राजापूरकर यांच्याकडून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील १० दिवसात मुंबईमधील सर्व रस्त्यांच्या लगतच्या भिंतीवर ईव्हीएमच्या विरोधात मजकूर लिहण्यात येणार आहे आणि ईव्हीएमचा विरोध करण्यात येणार आहे. राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत लागलेल्या निकालावर आणि ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे, त्याविरोधात ही मोहीम छेडण्यात आली आहे..राज्याचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर अद्याप कोणालाच सापडलं नाही. म्हणून राजकारणात काय सुरू आहे? कोण CM होणार यावर चर्चा सुरू आहे? मुख्यमंत्री दरे गावी जात असतात. मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगाव त्यांचं आवडीचं ठिकाण आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी परखडपणे सांगितलं आहे, की सरकार स्थापन करण्यात माझा अडसर नाही..नागपूरच्या कळमना परिसरात एका अगरबत्ती कारखान्यात भीषण आग लागल्याने मोठी हानी झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन वाहने दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..शरद पवार यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात जाऊन ईव्हीएम विरोधात आत्मक्लेष आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची भेट घेतली. गेल्या तीन दिवसांपासून बाबा आढाव आपल्या सहकाऱ्यांसोबत या आंदोलनाचा भाग आहेत. विधानसभेतील निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ईव्हीएम विरोधात हे आंदोलन सुरू आहे. शरद पवार यांच्या या भेटीमुळे आंदोलनाला पाठिंबा मिळाला असल्याचे मानले जात आहे..नवी दिल्ली - नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर कालच्या बैठकीत चर्चा झाली नाही. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची सुरू चर्चा होती. कालच्या बैठकीनंतर राजीनाम्यावर बोलण्यावर वरिष्ठांनी नकार दिल्याची माहिती आहे. .राम सातपुते यांच्या आरोपानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलीये. राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी केली होती..दिल्ली: कालिंदी कुंजमधील यमुना नदीवर विषारी फेस तरंगताना दिसत आहे. कारण, नदीतील प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याचं चित्र आहे..पुणे : गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा साहित्य, चित्रपट व कला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा विख्यात अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर झाला आहे. .नागपूर : नवीन महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन 16 ते 24 डिसेंबर दरम्यान नागपुरात होण्याची शक्यता आहे. अजून नवीन सरकार स्थापन होऊन विशेष अधिवेशन झालं नसल्याने नवीन सरकारचे अधिवेशन कधी होणार यावर चर्चा सुरू आहे..Latest Marathi Live Updates 30 November 2024 : मुख्यमंत्री पदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीत बैठकांवर बैठका होत आहेत. तसेच वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी, तसेच सशक्तीकरणासाठी निवडणुकीच्याआधी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. भाजपसह काही पक्षांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर तो रद्द करण्यात आला. व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्या जुहू येथील घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापा टाकला. राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार घडामोडी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल अचानक आपल्या दरे गावी दाखल झाले. त्यांच्या अचानक दौऱ्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. नवीन महायुती सरकारच पहिलं हिवाळी अधिवेशन 16 ते 24 डिसेंबर दरम्यान नागपुरात होण्याची शक्यता आहे. राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.