Latest Marathi News Updates : पुढील एक तासात अंधेरी, गोरेगावसह कांदिवली पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा
Breaking Marathi News live Updates 4 September 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
ज्येष्ठ नेत्या के. कविता यांचा सदस्यत्वाचा राजीनामा
हैदराबाद : केसीआर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मधून निलंबनानंतर दुसऱ्या दिवशी, बुधवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या के. कविता यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पक्षाचे संस्थापक आणि तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या कन्या असलेल्या कविता यांनी आपल्या वडिलांवर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दबाव असल्याचे सूचित केले.