परीक्षेपूर्वीच युट्यूबवरुन पॅटची नववीची प्रश्नपत्रिका फुटल्यानं खळबळ उडाली आहे. एससीईआरटीकडून पुणे पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एससीईआरटीच्या ‘पायाभूत चाचणी परीक्षा-दोन’ची प्रश्नपत्रिका युट्यूबवरून फुटली आहे. संबंधित युट्युब चॅनल आणि युट्युब चालकाविरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.