नांदेड : दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update
नांदेड : दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

नांदेड : दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

नांदेड : काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक होती. त्यामुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा अनेकांचा अंदाज होता. परंतु मागीत तीन दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. बुधवारी (ता. पाच) प्राप्त झालेल्या एक हजार ३२ अहवालापैकी ४५ व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात एक रुग्ण बरा झाल्याने त्यास सुटी देण्यात आली. सध्या १०३ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (corona update nanded)

हेही वाचा: पुणे : कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण

जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ६४६ एवढी झाली असून यातील ८७ हजार ८८८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढ्यावर स्थिर आहे. बुधवारी नांदेड वाघाळा महापालीका हद्दीत तब्बल ३७ रुग्ण आढळून आले. नायगावला एक, बिलोलीत एक, हदगावला एक, कंधारला दोन, देगलूरला एक, मुखेडला एक व अकोला येथील एक असे मिळून ४५ जणांचे अहवाल बाधित आले आहेत.(nanded news)

हेही वाचा: बेळगाव : आंतरराज्य वाहतूक सुरु राहणार

सध्या विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आठ, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील ८८, नांदेड वाघाळा महापालिकेच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयात दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणातील एक तर खासगी रुग्णालयातील चार असे एकूण १०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.(Covid care center)

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण बाधित - ९० हजार ६४६

  • एकूण बरे - ८७ हजार ८८८

  • एकूण मृत्यू - दोन हजार ६५५

  • सोमवारी बाधित - ४५

  • सोमवारी बरे - एक

  • सोमवारी मृत्यू - शून्य

  • उपचार सुरु - १०३

  • गंभीर रुग्ण - तीन

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top