दालनांचा ताबा घेतला, आता प्रतीक्षा खात्यांची

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 3 January 2020

आघाडी सरकारमधील मंत्र्यांना काल मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले असतानाच जवळपास सर्वत्र मंत्र्यांनी त्याचा ताबा घेतला. मात्र, अद्यापपर्यंत खात्यांचे वाटप झाले नसल्याने मंत्री ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे मंत्रालयात चित्र आहे.

मुंबई- महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन महिना उलटला तरी, सरकार अद्यापपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाही. आघाडी सरकारमधील मंत्र्यांना काल मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले असतानाच जवळपास सर्वत्र मंत्र्यांनी त्याचा ताबा घेतला. मात्र, अद्यापपर्यंत खात्यांचे वाटप झाले नसल्याने मंत्री ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे मंत्रालयात चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या महाविकास आघाडीचे ३२ कॅबिनेट, तर १० राज्यमंत्री आहेत. या मंत्र्यांना  मंत्रालय आणि विधानभवनात दालनांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांनी दालनांचा ताबा घेतला; परंतु मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप झाले नसल्याने दालनांमध्ये मंत्री फक्‍त बसून होते. खात्याचे वाटप नसल्याने कोणत्याही फाइल्स मंत्र्यांकडे येत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय कारभार अद्याप सुरूच नसल्याचे चित्र आहे.  

हेही वाचा : "शिवभोजन योजनेची ‘लिमिटेड थाळी’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवगिरी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे-पाटील यांना शिवगिरी, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा हे मलबार येथील बंगले वाटप झाले आहेत. तर इतर मंत्रयांना मंत्रालयाशेजारील बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘राष्ट्रवादी’चे लक्ष आता दलित समाजाकडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra minister wait for department