

Latest Marathi News Live Update
esakal
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत तब्बल १ हजार ९३७ कोटी रुपयांचा विक्रमी लाभ वितरित करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील सुमारे ४.३४ लाख शेतकरी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या २४ व्या हप्त्याचे देशपातळीवर वितरण करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून या सोहळ्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थिती लावली होती, तर यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.