मान्सूनचा लपंडाव सुरुच; पुन्हा तारीख बदलली, राज्यातील आगमन लांबलं

वेळेआधी दाखल होणार मान्सून रेंगाळला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे
Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon Updateesakal
Summary

वेळेआधी दाखल होणार मान्सून रेंगाळला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे

यंदा वेळेआधी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार केरळमध्ये मान्सून दाखल होऊन त्याने महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण केले. पाऊस लवकर येणार असल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामेही आटोपून घेतली आहेत. मात्र आता पुन्हा एकदा मान्सूनची तारीख पुढे गेली आहे. वेळेआधी दाखल होणार मान्सून रेंगाळला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Maharashtra Monsoon Update)

कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण कायम आहे. अधून मधून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतो. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे.

Maharashtra Monsoon Update
वर्षावर आमदारांच्या बैठकीत आंबा पडला! आणि उद्धव ठाकरे म्हणाले...

उष्णतेची लाट असली तरी विदर्भातील काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांनी या दोन ते तीन दिवसांत उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून मान्सून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. त्यानंतर आता तो गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. मान्सून राज्यात आता तो 12 ते 13 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता. मान्सूनच्या या लंपडावामुळे शेतकरी मात्र चिंतीत झाला आहे.

Maharashtra Monsoon Update
बोरीस जॉन्सन यांचं पंतप्रधानपद कायम; विश्वासदर्शक ठराव जिंकला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com