
maharashtra weather update
ESakal
राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई-पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, बीड, जालना, लातूर, अहिल्यानगर, नागपूर जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडलाय. नद्या इशारा पातळीवर पोहोचल्या आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. दरम्यान, मंगळवारीही राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. वादळी वारे, वीजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय.