Maharashtra Municipal Elections Update
esakal
गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र, आता या ठिकाणी निवडणुका होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. प्रलंबित २९ मनपाच्या निवडणुका आता एकाच टप्पात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोमवारनंतर कधीही याची घोषणा होऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.