

Maharashtra Government Decision New Offices
esakal
Administrative Reforms Maharashtra : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप, वाढती लोकसंख्या आणि दुर्गम भागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये नवीन अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि अप्पर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून प्रस्तावांवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.