Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court Hearing

Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता

Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील होणारी कालची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर आज यावर सुनावणी पार पडणार होती. मात्र, आजच्या सुनावणीवरदेखील अनिश्चिततेचे सावट आहे. सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राच्या कामकाजाबाबची नोंद समाविष्ट नाही. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: तेलंगणात भाजप नेत्याने अमित शहांची उचलली चप्पल, VIDEO

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुनावणीबाबत प्रमुख सुची आणि पुरवणी सुचीमध्येही हे प्रकरण लिस्टेड नाही. त्यामुळे आजच्या सुनावणी संदर्भात संभ्रम व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली तर अपात्र आमदार तसंच खासदारांचा मुद्दा घटनापीठाकडे पाठवण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली जाणार का यावर शिंदे - ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून आहे.

हेही वाचा: मुंबई : दहिहंडीच्या थरावरुन पडल्यानं २४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

ठाकरे सरकारला पायउतार करून नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले त्यानंतरही आजपर्यंत राज्यातील सत्तेचा पेच कायम असून, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी 'तारीख पे तारीख'चं सत्र सुरु आहे. त्यामुळे हा सत्तासंघर्षाचा पेच नेमका कधी सुटणार असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

Web Title: Maharashtra Political Crises Eknath Shinde Uddhav Thackeray Hearing Of Todays May Be Postponed Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..