भाजप धादांत खोटे बोलतं, व्हिपवरुन राष्ट्रवादीचं टीकास्त्र

' विधानसभा निवडणुकीसाठी व्हीप लागू होतो.'
BJP And NCP
BJP And NCP esakal
Updated on

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी आज रविवारी (ता.तीन) निवडणूक होत आहे. विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता.चार) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. दुसरीकडे आज होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांना व्हिप बजावला आहे. (Maharashtra Politics BJP Speaks Lie, Nationalist Congress Party Allegation)

BJP And NCP
राजापूर-विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार साळवींचा अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) मुख्य प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) म्हणाले, की विधानसभा निवडणुकीसाठी व्हीप लागू होतो. व्हीप लागत नाही हे भारतीय जनता पक्ष धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. भाजपला (BJP) माहीत आहे काय होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला. पक्षांनी व्हीप काढला आहे. पक्षाविरोधात मतदान झाले तर कारवाई होईल असे अनिल पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

robbery
temprature
Pune Politics heats up as BJP leader Ganesh Bidkar complains against NCP corporator Amol Balwadkar, accusing him of being arrogant and stubborn. Balwadkar hits back, calling the allegations baseless and vowing to intensify his fight for Pune citizens.
Justice for the 10-year-old girl: Thousands join silent march in Pimpalwandi, demand fast-track trial and strictest punishment for the accused.
Marathi News Esakal
www.esakal.com