

Shiv Sena Leaders Demand Eknath Shinde as Chief Minister
esakal
Pratap Sarnaik’s Statement on Eknath Shinde’s CM Return : राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. एकाच दिवशी तीन नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या विधानांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.