Shivsena : उद्धव ठाकरे, CM शिंदे एकाच वेळी बोलणार; दिल्लीतून होणार मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Uddhav Thackeray

Shivsena : उद्धव ठाकरे, CM शिंदे एकाच वेळी बोलणार; दिल्लीतून होणार मोठी घोषणा

Eknath Shinde Prees Conference In Delhi : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. त्यात आज उद्धव ठाकरेंची सभादेखील होणार असून, ठाकरेंच्या भाषणावेळीच मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे शिंदेंकडून ठाकरेंच्या भाषणात खोडा घालण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना? असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या भाषणावेळी पत्रकार परिषद घेऊन सीएम शिंदे राज्याचं आणि देशाचं लक्ष वेधणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Sharad Pawar : शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ते राहुल गांधीची 'भारत जोडो यात्रा'; पवार म्हणाले...

दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे सहकाही मंत्र्यांसोबत दुपारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असून, यादरम्यान ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्वीनी वैश्णव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर शिंदे दिल्लीतील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. मात्र, या संवादासाठी जी वेळ साधली गेली आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: Rohit Pawar : ...तर, वेदांता पुन्हा येऊ शकतो; रोहित पवारांच्या विधानानं आशा उंचावल्या

शिंदे दिल्लीत करणार मोठी घोषणा?

दरम्यान, आज संध्याकाळी मुंबईतील नेक्सो मैदानावर उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या गटप्रुमखांना संबोधित करणार आहेत आणि त्याचवेळी शिंदे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिंदे एखादी मोठी घोषणा करणार असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्याशिवाय शिंदे यांच्या समवेत यावेळी काही महत्त्वाचे नेतेदेखील उपस्थित असणार आहेत. तेदेखील काही महत्त्वाच्या घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिंदे दिल्लीतून नेमकी काय मोठी घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Politics Eknath Shinde Delhi Press Conference Uddhav Thackeray Sabha Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..