राज्यात वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीवरही बोलले

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजदराबाबत मोठी घोषणा केली. पुढचे पाच वर्षे वीजेचे दर कमी होतील असं फडणवीस यांनी म्हटलंय.
Maharashtra Gets Power Tariff Relief CM Fadnavis Speaks on Loan Waiver Too

Maharashtra Gets Power Tariff Relief CM Fadnavis Speaks on Loan Waiver Too

Esakal

Updated on

राज्यात वीजेचे दर पुढच्या पाच वर्षात वाढणार नाहीत तर दर वर्षी २ टक्क्यांनी कमी होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वीज दर, शेतकरी कर्जमाफी आणि राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सांगितलं. गेल्या १५-२० वर्षात वीजेचे दर वाढले पण पुढच्या पाच वर्षात कमी होतील असं फडणवीस म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com